फ्लॅटमधून कोटींची रोकड जप्त, नोटांचे ढिगारे पाहून पोलीस चक्रावले

एवढी रक्कम आली कुठून
intelligence story police raided a flat in nagpur maharashtra
intelligence story police raided a flat in nagpur maharashtraDainik Gomantak

महाराष्ट्रातील नागपूर येथील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून तेथून 4 कोटी 30 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन हवाला व्यापाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईची माहिती डीसीपी गजानन राजमाने यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी (police) शुक्रवारी रात्री उशिरा हा छापा टाकला.

intelligence story police raided a flat in nagpur maharashtra
बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाने केला गोळीबार, 5 ठार

डीसीपीने पुढे सांगितले की ही रक्कम इतकी होती की मोजणीसाठी मशीन मागवावी लागली. पोलिसांनी हवाला व्यापारी नेहल बादलिया, विलासभाई पाचीकर आणि शिवकुमार दिवानीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक (Arrested) केली आहे.

सध्या एवढी मोठी रक्कम वसूल केल्यानंतर आता तिघांचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींची चौकशी करून त्यांच्याकडे एवढी रक्कम कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com