राजकारणात अनेकदा मार्ग बदलतात मात्र जे नाते जुडले आहे ते कायम राहते असे विधान शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपासोबतच्या(BJP) संबंधांवर केले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद आहेत, मात्र अजून आमची मैत्री आजही कायम आहे असं स्पष्ट करत असतानाच संजय राऊत यांनी यावेळी आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं उदाहरण दिलं आहे.
“देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद तर नक्कीच आहेत आणि मीदेखील अनेकवेळा हेच सांगत असतो . आम्ही काय भारत पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होती असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. फडणवीसांनी हेच सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच उदाहरण देत “आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत… तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
काल बोलताना फडणवीस म्हणाले होते की परिस्थिनुसार राजकारणातील समीकरणे बदलत असतात
देवेंद्र फडणीस नेमके काय म्हणाले होते -
आमचे शिवसेनेची कुठलेही मतभेद नव्हते, असं म्हणत त्यांनी सेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या प्रश्नाला बगल देत. राजकारणात जर-तरच्या प्रश्नाला अर्थ नसून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, असं म्हणत त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं.आमचा वाद धुऱ्याचा वाद नाही. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाही. असे विधान करत सेना भाजप एकत्र येण्यावरदेवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत या युतीची शक्यता स्वीकारली नसली, तरी फेटाळली देखील नाहीत.
यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे , “त्यांच्याकडे जास्त माहिती असेल. परिस्थिती आता काय आहे आणि भविष्यात काय असेल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था आहे, जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम चालू आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असून सरकार पाच वर्ष चालणार नाही”.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.