आमच्यात काही हाडवैर नाही- देवेंद्र फडणवीस

राजकारणात जर-तरच्या प्रश्नाला अर्थ नसून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, असं म्हणत या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळलं.आमचा वाद धुऱ्याचा वाद नाही. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाहीये
देवंद्र फडणवीस
देवंद्र फडणवीस Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे(Maharashtra Assembly) अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे 2 दिवस चालणार हे अधिवेशन वादळी होणार हे नक्की झाले आहे कारण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. अधिवेशनात कोणतेही संसदीय आयुध वापरता येणार नाही, अशा पद्धतीने सारी आखणी करण्यात आली असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

हे असे वागून सरकार आमची कोंडी करत आहे मात्र अशी कितीही कोंडी केली तरी जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. प्रश्न अधिवेशनात मांडता आले नाहीत तर जनतेत जाऊन, रस्त्यावर उतरून ते आम्ही मांडू, असा इशाराही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे .

देवंद्र फडणवीस
देशातील सर्व डॉक्टरांना भारत रत्न द्या- Arvind Kejriwal

तसेच मागील काहीदिवसांपासून विधानसभा अध्यक्ष पदही रिक्त आहे त्यावरही फडणवीसांनी आपला निशाणा साधला आहे. सरकारमधील तीन पक्षांमध्ये विसंवाद असल्यानेच विधानसभा अध्यक्षांची निवड अद्याप झाली नसून आताही ती होईल असे वाटत नाही, असे मत मांडतानाच तुमच्याकडे बहुमत आहे तर मग हे महत्त्वाचे पद रिक्त का ठेवले, असा सवालही त्यांनी सरकारवर केला आहे.

याच पत्रकार परिषदेत सेना भाजप एकत्र येण्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत या युतीची शक्यता स्वीकारली नसली, तरी फेटाळली देखील नाही.आमचे शिवसेनेची कुठलेही मतभेद नव्हते, असं म्हणत त्यांनी सेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या प्रश्नाला बगल देत. राजकारणात जर-तरच्या प्रश्नाला अर्थ नसून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, असं म्हणत त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं.आमचा वाद धुऱ्याचा वाद नाही. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाहीये. वैचारिक मतभेद तर आहेच असेही फडणवीस म्हणाले आहेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com