किरीट सोमय्या गोव्याच्या बिळात, संजय राऊतांचा घणाघात

आयएनस (INS) निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

आयएनस निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्यांनी 11 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली केली होती. सोमय्या आणि त्यांच्या मुलावर 2013-14 मध्ये आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेदरम्यान जमा करण्यात आलेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणी सोमय्यांना मोठा झटका न्यायालयाने दिला आहे. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या प्रकरणावरुन भाजपला लक्ष केले. माध्यमाशी बोलताना सोमय्या पितापुत्रांवर राऊतांनी शरसंधान साधले. (Sanjay Raut has said that Kirit Somaiya may be hiding in Goa or Gujarat)

Sanjay Raut
अमली पदार्थाच्या तस्करीत अटकेत असलेल्या रियाझचा जामीन न्यायालयाने फेटाळला

संजय राऊत म्हणाले, ‘’आयएनएस विक्रांतसंबंधी जो घोटाळा झाला तो दुर्देवी आहे. सोमय्या पितापुत्र आता परदेशात पळून गेले असावेत. सोमय्यांनी या घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीसाठी वापरली आहे. 714 डब्यातून गोळा केलेला पैसा कुठे गेला? आम्ही हे प्रकरण उघड केल्यानंतर भाजप नेते आता स्पष्टीकरणे देत आहे. त्याचबरोबर एक भारतीय युध्दनौका सौमय्याने भंगारात काढली.’’

Sanjay Raut
आयएनस निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

राऊत पुढे म्हणाले, ‘’किरीट सोमय्या एक ब्लॅकमेल करणारा व्यक्ती आहे. आम्ही सौमय्यांचा लवकरच फर्दाफाश करणार आहोत. लोकांना धमक्या देऊन करोडो रुपये सौमय्याने जमा केले आहेत. ईडी कार्यालयात बसून सौमय्या काय करतात? सोमय्या पितापुत्र आता जेलमध्ये जाणार हे नक्की आहे. त्यांच्या घटीका भरल्या आहेत. परंतु आमच्यावर आरोप केलेली प्रकरणे 10 ते 15 वर्षे जुनी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने सोमय्यांचा तपास करुन मुंबई पोलिसांच्या हवाली करावे. मला माहितीये सोमय्या कुठे लपून बसले असावेत. ते केवळ नि केवळ भाजपशासित राज्यांमध्ये लपून बसले आहेत. त्यामध्येही मला शंका आहे की, ते गोव्यात असू शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे स्थापन होऊ नये यासाठी माझ्याबरोबर आमच्या नेत्यांचे फोन टॅप केले.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com