अमली पदार्थाच्या तस्करीत अटकेत असलेल्या रियाझचा जामीन न्यायालयाने फेटाळला

शेखला 23 फेब्रुवारी रोजी गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) दारू आणि चार किलो अमली पदार्थासह अटक केली होती.
court rejected bail of person arrested for drug trafficking in goa
court rejected bail of person arrested for drug trafficking in goaDainik Gomantak
Published on
Updated on

कोलवा: रियाझ अब्दुल शेख या व्यक्तीला चार किलो अमली पदार्थासह अटक करण्‍यात आलेली होती. दरम्यान संबंधित जामीन अर्ज शनिवारी अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने (Additional Sessions Court) फेटाळण्यात आला आहे. (court rejected bail of person arrested for drug trafficking in goa)

court rejected bail of person arrested for drug trafficking in goa
गोवा विद्यापीठात 8 मार्चपासुन पीएचडी प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

शेखला 23 फेब्रुवारी रोजी गोवा पोलिसांच्या (Goa Police) अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) दारू आणि चार किलो अमली पदार्थासह अटक केली होती. तसेच त्याच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या कलम 20 (b) (ii) (B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

1985 फिर्यादी पक्षाने असा युक्तिवाद केला की यापूर्वी देखील, आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरविण्यात आले होते आणि त्याने या गुन्ह्यासाठी आधीच पाच वर्षांची शिक्षा भोगली आहे. कर्नाटकातील (Karnataka) एका खुनाच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे त्यात म्हटले आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश चोलू गौन्स यांनी शेखचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Temwada Beach Demolition
Sanjeel Kudchadkar Kidnapping Suspect
 Madhya Pradesh Tourism 2025
Girish Chodankar Anti Defection Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com