Sammruddhi Mahamarg: उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गाची कमान कोसळून मोठी दुर्घटना, 1 ठार तर 2 जखमी
Sammruddhi Mahamarg
Sammruddhi MahamargDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रामधील हा समृद्धी महामार्ग हा सर्वात मोठ प्रकल्प आहे. या महामार्गाची उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 3 वाजता नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाल्याचे समजले आहे.

समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत , त्यापैकी मोठी असलेली 16 व्या क्रमांकाची कमान कोसळून हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण MSRDC ने पुढे ढकलले आहे. या अपघातातील मृत मजूर बिहारचा आहे असजी माहिती मिळली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्धाटना पूर्वीच ही मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

Sammruddhi Mahamarg
Weather Alert: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस वादळासह पावसाची शक्यता

* समृद्धी महामार्गाचा उद्घाटनसोहळा पुढे ढकलला

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्यात येणार होते पण हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत.16 व्या ओव्हरपासचे दुरुस्तीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ते 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. अशातच ही दुर्घटना घडल्यामुळे आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com