राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळासह पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. याशिवाय काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. (Maharashtra Weather Alert News)
मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर पावसाचे वातावरण तयार झाले आहे.तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र तारांबळ उडाली आहे.वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.