सचिन वाझेची आता CBI चौकशी

सीबीआय(CBI) १०० कोटी वसुली प्रकरणात लवकरच सचिन वाझेची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Sachin Waze is now under CBI investigation
Sachin Waze is now under CBI investigationDainik Gomantak
Published on
Updated on

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत कारण तुरुंगात असलेल्या सचिन वाजेची (sachin waze) चौकशी करण्यास सीबीआयला न्यायालयाने (CBI ) परवानगी दिली आहे. राज्यात गाजत असलेले अंबानींच्या घराबाहेर सापडलेले स्फोटके प्रकरण किंवां त्यांनतर झालेली मनसुख हिरेन हत्त्या प्रकरण असुद्या या सगळ्या प्रकरणात एक नाव समोर आले ते म्हणजे सचिन वाझे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेटदिले होते असा आरोपच परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात केला होता. त्या प्रकरणात सीबीआयला आता सचिन वाजेची चौकशी करायची असून . १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीपाठोपाठ सीबीआयनेही कोर्टात वाजेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता.आणि त्याच अर्जाच्या सुनावणीवर न्यायालयाने सीबीआयला चॊकशीची परवानगी दिली आहे.

Sachin Waze is now under CBI investigation
SEBIच्या गुंतवणूक सल्लागारांना कानपिचक्या

त्यानुसार, सीबीआय १०० कोटी वसुली प्रकरणात लवकरच सचिन वाझेची CBI चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे . वाजे याला एनआयएने अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या सगळ्या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणावर मोठे पडसाद उमटले होते. ज्याचे परिणाम आजही राजकारणात दिसत आहेत. अँटिलिया बाहेर कारमध्ये स्फोटकं सापडल्यापासून सुरु झालेल्या या प्रकरणाने नंतर वेगळेच वळण घेतले. या प्रकरणामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदलीही करण्यात आली होती . त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या लेटर बॉम्ब नंतर तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन चोकशाहीला सामोरे जाणार असल्याच सांगिले होते . आणि याचेच परिणाम सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्यात झाले आणि आज सुद्धा हे प्रकरण असेच गाजत आहे .

आता सचिन वाझेच्या सीबीआय चौकशीत कुठल्या नवीन गोष्टी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com