SEBIच्या गुंतवणूक सल्लागारांना कानपिचक्या

मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) गुंतवणूकदारांना सल्ला (Investment Adviser) दिला आहे की, ते फक्त आपल्या ग्राहकांना सल्ला देऊ शकतात.
SEBI advises investment advisors
SEBI advises investment advisors Dainik Gomantak
Published on
Updated on

मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (Sebi) गुंतवणूकदारांना सल्ला (Investment Adviser) दिला आहे की, ते फक्त आपल्या ग्राहकांना सल्ला देऊ शकतात. त्यांचे फंड किंवा शेअर्समधील गुंतवणूक व्यवस्थापित करू शकत नाही. त्यांना हा अधिकार नाही, म्हणून त्यांच्या ग्राहकांकडून पॉवर ऑफ अटर्नी मागणे योग्य नाही. वॉटरफील्ड फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट एडव्हायझरी फर्मने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून सेबीने हे स्पष्टिकरण दिले आहे. (SEBI advises investment advisors saying it is not their right to manage funds)

SEBI advises investment advisors
LPG गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सेबीचे म्हणणे आहे की, गुंतवणूक सल्लागारांचे काम केवळ त्यांच्या ग्राहकांना गुंतवणूकीबद्दल सल्ला देणे आहे, त्यांच्या वतीने गुंतवणूक करणे नाही. सेबीने असेही म्हटले आहे की, गुंतवणूकीच्या सल्लागाराने आय.ए. च्या नियमांतर्गत केलेल्या कामांची व्याप्ती लक्षात घेऊन कार्य केले पाहिजे. "पीओए देण्याची कल्पनाही केलेली नाही आणि आयएसाठी ते इष्टदेखील दिसत नाही."

SEBI advises investment advisors
Share Market: महिन्याच्या पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये घसरण

सल्लागार कंपनीने मागितला होता सल्ला

वॉटरफील्ड फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने गुंतवणूक सल्लागारांशी संबंधित नियमांबाबत सेबीला सल्ला मागविला होता. सल्लागार कंपनीने ग्राहकांनी त्यांना स्वेच्छेने परवानगी देऊ शकेल जेणेकरून ते त्यांच्याकडूनच त्यांच्या खात्यावर कस्टोडियमकडून चौकशी करु शकतील, असे कंपनीने सेबीला विचारले. त्यांच्या ग्राहकांच्या गुंतवणूकीच्या निर्णयाबद्दल आणि गुंतवणूकीच्या उत्पादनांबाबत सूचना मिळवू शकतील का? असा प्रश्न ही कंपनीने त्यांना विचारला होता. सेबीने या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक प्रपत्र जारी केले आहे, जरी हे दिशानिर्देश विचारलेल्या प्रश्नांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले असले तरी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नियम बदलणे शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com