Bhagwat On Population Control: देशाला व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर प्रथमच दिसल्या महिला प्रमुख पाहुण्या
Mohan Bhagwat
Mohan BhagwatDainik Gomantak
Published on
Updated on

Bhagwat On Population Control: लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा असो की, धर्माधारित लोकसंख्या असंतुलन या मुद्याकडे फारकाळ दुर्लक्ष करता येणार नाही, देशाला एका व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. संघाच्या मुख्यालयात नागपूर येथे विजयादशमी निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Mohan Bhagwat
Shirdi Sai Mandir: आज शिर्डी साई मंदिर भक्तांसाठी रात्रभर राहणार खुले

यावेळी शस्त्रपुजनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या एकमेव महिला संतोष यादव उपस्थित होत्या. या निमित्ताने संघाच्या व्यासपीठावर प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या उपस्थित राहिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रमुख उपस्थित होते.

भागवत म्हणाले, देशाला एका व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज आहे. जे सर्वांनाच लागू असेल. राष्ट्रहीत लक्षात घेऊन लोकसंख्या असंतुलनावर लक्ष्य ठेवले पाहिजे. जेव्हा सर्वांसाठी एकच धोरण असेल तेव्हा त्यातून कुणालाही सूट मिळणार नाही. लोकसंख्या महत्वाची असते, ती वाढणे बंद होते तेव्हा समाज आणि भाषा लुप्त होतात.

लोकसंख्येतील असमानतेमुळे भौगोलिक सीमा बदलतात. लोकसंख्या नियंत्रण आणि धर्मावर आधारित लोकसंख्या संतुलन या मुद्यांकडे फारकाळ दुर्लक्ष करता येणार नाही. धर्माधारित भेदभाव आणि धर्मपरिवर्तन देशात फुट पाडतात. ईस्ट टिमोर, कोसोवो आणि साऊथ सुदान हे देश त्याचे उदाहरण आहेत.

Mohan Bhagwat
Cheetah Helicopter Crash: लष्कराचे चिता हेलिकॉप्टर अरूणाचल प्रदेशात क्रॅश, एका पायलटचा मृत्यू

आक्रमक गेले, पण महिलांवरील निर्बंध राहिले

मोहन भागवत म्हणाले की, महिलांना बरोबरीचा अधिकार, कामाचे स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. या बदलाची सुरवात आम्ही आमच्या कुटूंबापासून करत आहोत. संघाने गिर्यारोहक संतोष यादव यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले आहे. आक्रमक निघून गेले, पण महिलांवरील निर्बंध अजून तसेच आहेत. आपण महिलांना स्वातंत्र्य दिलेच नाही.

...तर नवे शैक्षणिक धोरण अपयशी ठरेल

मोहन भागवत म्हणाले, आपण आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देत असलेल्या संस्थांमध्ये पाठववतो का? तसे केले नाही तर नवे शैक्षणिक धोरण (New Educational Policy) यशस्वी ठरणार नाही. चांगल्या करियरसाठी इंग्रजी शिक्षण हे एक मिथक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com