Shirdi Sai Mandir: आज शिर्डी साई मंदिर भक्तांसाठी रात्रभर राहणार खुले

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Dasara Special| Shirdi
Dasara Special| ShirdiDainik Gomantak
Published on
Updated on

शिर्डीमधील श्री साईबाबा समाधी मंदिर हे आज साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दसरा (Dasara)आणि पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे.

शिर्डीत साईबाबांचा (Sai Baba) पुण्यतिथी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आज पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने देश- विदेशातील लाखो भाविकांनी साईबाबाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. भाविकांच्या‌ गर्दीने शिर्डी नगरी फुलून गेली आहे. यामुळे भानिकांना दर्शम घेणे सोईस्कर होण्यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे.

Dasara Special| Shirdi
Bandra-Worli Sea Link Accident: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक अपघातात पाच जणांचा मृत्यू, 3 गंभीर

कोरोनामुळे (Corona) दोनवर्षानंतर भक्तिमय वातावरणात आज चार दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने साई चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे. 103 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी आपला देह ठेवला होता. त्या द्वारकामाई परिसरात देखील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साई मंदिराला आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

आज 5 ऑक्टोबर या दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्‍याचा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com