महाराष्ट्रात गेल्या सात दिवसात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात झाली सर्वाधिक कोरोना वाढ
Covid-19
Covid-19Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना रुग्णांचा आकडा देशात वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात ही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यामूळे केंद्र आणि राज्य शासनाने याबाबत खबरदारी घेत मास्क वापर अनिवार्य सारख्या नियमांची अंमलबजाणी करणारे निर्णय राज्य शासन करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. ( Rapid increase in the number of corona patients in Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने या बैठकीत चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे.

Covid-19
महाराष्ट्रात 3 नव्या अभयारण्यांसह 12 संवर्धीत क्षेत्रांची घोषणा

महाराष्ट्रातील आजची कोरोनास्थिती

सर्वाधिक वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची 95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण गंभीर लक्षणे आहेत. आज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,38, 938 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.03 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे.

Covid-19
''सर्वप्रथम देश आणि नंतर स्वतः हे भाजपाला कधी समजणार''

सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे

मुंबई

30 मे ते 5 जून - 4880 रुग्ण

23 ते 29 मे - 2070 रुग्ण

135.75 % वाढ

ठाणे

30 मे ते 5 जून - 1245 रुग्ण

23 ते 29 मे - 427 रुग्ण

191.57 % वाढ

पुणे

30 मे ते 5 जून - 538 रुग्ण

23 मे ते 29 मे - 357 रुग्ण

50.70 % वाढ

रायगड

30 मे ते 5 जून - 244 रुग्ण

23 ते 29 मे - 106 रुग्ण

130.19 % वाढ

पालघर

30 मे ते 5 जून - 144 नवे रुग्ण

23 ते 29 मे - 32 नवे रुग्ण

350.00 % वाढ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com