भाजपचे अनेक नेते हे वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याचदा चर्चेत आले आहेत. मग ते कारण सकारात्मक असो की नकारत्मक. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चर्चेदरम्यान कथितपणे प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याने या टिप्पणीनंतर देशभरात पडसाद उमटत आहेत. (Nana Patole criticizes BJP )
या विधानामूळे उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली. यामध्ये 12 हून अधिकजण जखमी झाले आहेत. हे कमी की काय म्हणून कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपावर टीका केली आहे.
नाना पटोले यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची भाजपाने पक्षातून हक्कालपट्टी केली आहे. ते दोघंही समाजात धार्मिक द्वेष पसरवत होते. महाराष्ट्रातही अशा प्रकारचे काही भाजपा नेते आहेत, जे रोज धार्मिक द्वेष पसरवत आहेत.” यानंतरच्या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की,‘सर्वप्रथम देश आणि नंतर स्वतः हे भाजपाला कधी समजणार देव जाणो. अमेरिका, अनेक युरोपियन देश व आखाती देशांनी भारतावर व्यापार बंदी आणली, तेव्हा मोदी सरकारची अक्कल ठिकाणावर आली. नाहीतर निवडणूक जिंकण्यासाठी हे सख्ख्या भावांमध्ये देखील भांडण लावतील.
भाजप मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी
कथित प्रेषित मोहम्मद अपमानास्पद टिप्पणी प्रकरणी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये 12 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. सद्या कानपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र आता संबंधित वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. भाजपाने काल भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.