आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. पावसाच्या शक्यतेमुळे खुल्या मैदानात सभा घेण्याऐवजी एका सभागृहात सभा घेण्याचा निर्णय झाला आहे. सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) निवडण्यात आला आहे. पुण्याचे मनसे प्रदेशाध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सभेला 10 ते 15 हजार लोक येण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray will address rally today ganesh kala krida manch pune news)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 4 दिवसांच्या पुणे दौर्यावर असलेले राज ठाकरे 2 दिवसांतच मुंबईला परतले. काही वर्षांपूर्वी टेनिस खेळताना दुखावलेला पाय पुन्हा त्रास देत असल्याने ते परत आल्याचे सांगितलं जात आहे. या दुखण्यामुळे त्यांनी आगामी 5 जूनचा अयोद्धा दौरा देखील रद्द केला आहे. राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी युपीतील संतमहंतांची माफी मागावी आणि नंतरच उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवावे असे आव्हान दिले होते. त्यामुळेही राज ठाकरेंचा दौरा चर्चेत होता.
राज ठाकरेंनी ट्वीट करत अयोद्धा दौरा तूर्तास स्थगित केला आहे अशी माहिती दिली होती. आता हा दौरा कधी, कसा होणार? याबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसैनिक आणि लोकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.