राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; BMC ने बजावली दुसरी नोटीस

बीएमसीने राणा दाम्पत्याला नोटीस बजावून घरातील बेकायदा बांधकामाबाबत सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi Rana Dainik Gomantak
Published on
Updated on

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढतच आहेत. तुरुंगातून सुटलेल्या राणा दाम्पत्याला आता खारमधील घरातील बेकायदेशीर बांधकामाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी दुसरी नोटीस बजावली आहे. (BMC sends second notice to rana couple over illegal construction)

Navneet Rana and Ravi Rana
कर्तव्य बजावताना सातारा जिल्ह्याच्या जवानाला वीरमरण

बीएमसीने राणा दाम्पत्याला नोटीस बजावून घरातील बेकायदा बांधकामाबाबत सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यांच्या उत्तराने बीएमसीचे समाधान झाले नाही, तर बेकायदा बांधकाम पाडले जाऊ शकते. याआधीही बीएमसीने घराच्या बेकायदा बांधकामाबाबत राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. यानंतर राणा दाम्पत्याने शुक्रवारी नोटीसला उत्तर दिले, मात्र बीएमसीला त्यांचे उत्तर समाधानकारक वाटले नाही. परिणामी बीएमसीने पुन्हा नोटीस पाठवली आहे.

Navneet Rana and Ravi Rana
महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाईट अवस्था; 50 पैसे प्रतिकिलो कांदा

बीएमसीच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ : रवी राणा
बीएमसीच्या दुसऱ्या नोटिशीला आमदार रवी राणा यांनी कायदेशीर उत्तर देऊ, असे सांगितले. आम्ही बिल्डरकडून सदनिका विकत घेतल्याचे राणा यांनी सांगितले. त्यानंतर मी कोणतेही अवैध बांधकाम केलेले नाही. बीएमसीच्या मंजुरीनंतर ही इमारत बांधण्यात आली आहे.

इमारतीत बेकायदा बांधकाम झाले असेल तर पालिकेने त्याला मंजुरी कशी दिली?
रवी राणा म्हणाले की, या भागात बांधलेल्या सर्व इमारती एकाच बिल्डरने बांधल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com