छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणि शिवचरित्रासाठी आपले जीवन वेचणारे प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही एक भावपूर्ण पोस्ट लिहून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली होती. आणि आता राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(Raj Thackeray paid tribute to Babasaheb Purandare by special caricature )
ठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे पारिवारिक संबंध हे साऱ्या महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे हे ननाते देखील किती जवळचे आहे हे देखील साऱ्यांनी पाहिलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्यांनतर राज ठाकरे यांनी पुण्यात येत बाबासाहेबांचं अंत्यदर्शन घेतलं होत.
आणि आता राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे स्वर्गात प्रवेश करताना दिसत असून, सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज ‘ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस. अविश्रांत मेहनत घेतलीस. माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस, ये आता आराम कर', असे सांगत स्वागत करत असल्याचे दिसत आहेत.
दरम्यान शिवचरीत्र उभ्या महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचवणाऱ्या आपल्या वक्तृत्वाने मराठी माणसांना त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा तब्बल साठहून अधिक वर्षे प्रयत्न करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक होती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना न्युमोनियाची लागण देखील झाली होती.
बाबासाहेबानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्या ग्रंथास वाचकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रात नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेबानी लिहिलेले शिवचरित्र यांची चर्चा असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनी शिवचरित्राचे पारायण केले. बाबासाहेब हे शिवव्याख्याते म्हणून त्यांची लोकांना ओळख झाली. आणि त्यांच्या शिवचरित्राला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.