Bicholim: लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर 'मोगरी'चा दरवळ मंद; फुलांना मागणी घटली

Goa Temple Stampede: यंदा श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात ‘मोगरी’च्या फुलांची अपेक्षेप्रमाणे आवक झाली नव्हती. उलट ‘चेंगराचेंगरी’च्या दुर्घटनेनंतर फुलांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: यंदा श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात ‘मोगरी’च्या फुलांची अपेक्षेप्रमाणे आवक झाली नव्हती. उलट ‘चेंगराचेंगरी’च्या दुर्घटनेनंतर फुलांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला.

जत्रेपूर्वीच फूलविक्रेत्यांकडे मोगरीच्या फुलांचा भार झाला होता. जत्रेच्या दहा-ते बारा दिवस आधी बाजारात ‘मोगरी’च्या फुलांचा खच पडत होता. अवकाळी पाऊस त्यातच उष्णता वाढल्याने ‘मोगरी’चा बहर वाढला होता.

दरम्यान, आज (मंगळवारी) कौलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गावाबाहेरील भाविकांना गावात बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने यंदा ‘मोगरी’ला मोठीशी मागणी असणार नाही. अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा मोगरी विक्रीतून आर्थिक उलाढालीवरही जवळपास ५० टक्के घट अपेक्षित आहे.

Bicholim
Goa Drowning Death: पालकांच्या निष्‍काळजीपणामुळे 2 बालिकांचा बुडून अंत; शिरवई व आगोंद येथील घटना, 24 तासांत 3 बळी

दरम्यान, जत्रा ते कौलोत्सवपर्यंत शिरगावात मोगरीच्या कळ्यांना प्रचंड मागणी असते. दरवर्षी जत्रा काळात गोव्यासह शेजारच्या राज्यांतून मोगरीच्या फुलांची मोठी आवक होत असते. जत्रा काळात शिरगावात मोगरीच्या फुलांचा दरवळ पसरत असतो.

मोगरीच्या फुलांना असलेली मागणी पाहता, जत्रा काळात शिरगावात मोगरी फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा मोगरीचा तुटवडा आणि दुर्घटनेमुळे झालेला परिणाम, यामुळे यंदा मोगरी विक्रीवर मोठा परिणाम झाला.

Bicholim
Goa Drowning Death: गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे का? 11 दिवसांत 7 जण बुडाले, राज्य सरकारकडून सुरक्षेच्या उपायांची गरज
Bicholim
Goa Theft: केपे येथील सोन्याच्या दुकानातील चोरीप्रकरणी एका महिलेला पुण्यातून अटक, दोघांचा शोध सुरू

मोगरी देवीला प्रिय

शिरगावची श्री लईराई देवी म्हटली की, सुवासिक मोगरीच्या कळ्यांची आठवण येते. मोगरीचे कळे श्री लईराई देवीला प्रिय, अशी प्रत्येक भक्तांची भावना आहे. म्हणूनच देवीच्या दर्शनासाठी जाणारा प्रत्येक भाविक मोगरीचे कळे देवीच्या चरणी अर्पण करतात.

काही भक्तगण नवस बोलल्यानुसार ठरावीक कळ्यांच्या माळा देवीला अर्पण करतात. जत्रेदिवशी धोंड भक्तगणही मोगरीच्या माळा गळ्यात घालतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com