PM Modi Mumbai Visit: 'मुंबई देश की धडकन...', PM मोदींची मुंबईकरांना भावनिक साद

PM Narendra Modi: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
 PM Narendra Modi
PM Narendra Modi @ANI

PM Modi Mumbai Visit: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मोदींचा हा दौरा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत अनेक योजनांचा शुभांरभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते असल्याचा उल्लेख यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एकनाथ शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्र (Maharashtra) खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रगतीपथावर आहे. एकनाथ शिंदे सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम करत आहे. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेवर राज्य केलं त्यांनी केवळ मुंबईला लुटण्याचे काम केले, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

 PM Narendra Modi
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्विट; उद्याच्या महाराष्ट्र दौऱ्याची दिली माहिती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मुंबईतील माझ्या बंधू भगीणींना माझा नमस्कार.... देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचा विकास होणे गरजेचे आहे. मुंबईच्या विकासात आपल्या सर्वांचा हातभार लागत आहे. तर, भारत (India) खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रगतीपथावर काम करत आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत वर्षात देश जगात आपला ठसा उमटवत आहे. भारत आपल्या सामर्थ्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करत आहे.'

मोदी पुढे म्हणाले, 'भारताबाबत जगात पॉझिटीव्हीटी आहे. मागील आठ वर्षात देशाच्या विकासाचा मार्ग बदलला आहे. डबल इंजिन सरकारमध्ये आता देशाचा विकास होत आहे. आजची गरज आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन भारत काम करत आहे. विकसित भारताच्य निर्माणामध्ये आपल्या शहरांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.'

 PM Narendra Modi
PM Modi: PM मोदींनी भाजप नेत्यांना खडसावले,म्हणाले; मुस्लीमांबद्दल....

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, 'मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची कटिबध्दता आहे. काही काळासाठी देशाचा विकास मंदावला होता, पंरतु पुन्हा देशाने विकासाचा राजमार्ग तयार केला आहे. रेल्वे स्थानके देखील विमानतळांसारखी तयार होऊ लागली आहेत. मुंबईचा खऱ्या अर्थाने कायापालट होऊ लागला आहे. धारावी पुर्नविकास योजनेवर देखील शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे.'

'शहारांच्या समस्येवर सरकार काम करत आहे. तर देशात पायाभूत सुविधा वेगाने निर्माण होत आहेत. डबल इंजिन सरकारमुळेच महाराष्ट्रासह मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. भाजप कधीच विकासाच्या अडथळा निर्माण करत नाही. राजकीय स्वार्थासाठी आम्ही कधीच विकासाला ब्रेक लावला नाही,' असेही मोदी म्हणाले.

 PM Narendra Modi
Hasan Mushrif ED Raid: हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मुंबईत विविध उपक्रमांचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होत आहे. मुंबईचा विकास हेच आमचे ध्येय आहे. लोकप्रिय योजनांचा शुभारभं पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला. येत्या दोन-तीन वर्षात मुंबईचा कायापालट झालेला तुम्हाला दिसेल.'

शिंदे पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती विकास झाला हे तुम्ही पाहिलाच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते समृध्दी महामार्गाचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मार्गदर्शन केले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com