PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्विट; उद्याच्या महाराष्ट्र दौऱ्याची दिली माहिती...

मुंबईत मेट्रोने करणार प्रवास; कर्नाटकचाही करणार दौरा
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी मोदींनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली. ॉ

(PM Modi will Visit Maharashtra & Karnataka)

PM Narendra Modi
AAP: भरविधानसभेत आपच्या आमदाराने नोटांचे बंडल काढले, म्हणाले; भाजप...

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.

दरम्यान, 19 जानेवारीला कर्नाटकातील यादगिरीच्या कोडकल येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मोदी कलबुर्गी येथील मालखेड येथे बंजारा समाजाच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील. मुंबईत मेट्रो रेल्वेच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

PM Narendra Modi
Assembly Election Dates: त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा...!

महिन्यात दुसऱ्यांदा कर्नाटक दौरा

आगामी तीन ते चार महिन्यांत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदींचा कर्नाटक दौराही महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या महिन्यातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा कर्नाटक दौरा असणार आहे. यापूर्वी 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी हुबळी येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते.

पंतप्रधान मुंबईत मेट्रोने प्रवास करणार

मुंबईत सायंकाळी पाच वाजता वांद्रे कुर्ला संकुल येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2 A आणि 7 (दुसरा टप्पा) चे उद्घाटन करतील तसेच मेट्रो रेल्वेतून प्रवास करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com