PM Modi Mumbai Visit: काँग्रेसकडून पंतप्रधानांचा 'बादशाह मोदी' असा उल्लेख...

मुंबई दौऱ्यापुर्वी झोपड्या झाकल्यावरून टीका
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत.

या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PM Narendra Modi
Popular Front of India: भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा PFI चा कट

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे.

या दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पांढऱ्या कपड्याने रस्त्यांच्या कडेला असणारी घरे आणि झोपड्या यांना झाकण्यात आलं आहे.

काँग्रेसने ट्विटरवरून याचा व्हिडीओ शेअर करत मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसने काय म्हटलंय...

"बाअदब, बामुलाहिज़ा, होशियार! बादशाह मोदी मुंबईत येत आहेत, त्यांच्या डोळ्यांना गरीबी दिसू नये म्हणून सोय करण्यात आलीय. दरवेळीप्रमाणे गरीबीला झाकून ठेवण्यात आलं आहे.

जेणेकरून बादशाहाचे मन गरीबी पाहून दुःखी होऊ नये. यावेळी बादशाहाने मोठं मन दाखवत गुजरातप्रमाणे भींत बांधून घेतली नाहीये," अशी खोचक टीका काँग्रेसने ट्विटमधून केली आहे.

PM Narendra Modi
Lithium Reserves in India: गुड न्यूज! भारताच्या 'या' राज्यात सापडला 5.9 मिलियन टन लिथियमचा साठा

दोन वंदे भारत एक्सप्रेसची आजपासून सुरवात

मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले आहे. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.

दोन हजारहुन अधिक फौजफाटा

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झाले असून सीएएमटी रेल्वे स्थानक परिसरात दोन हजारांहून अधिक फोजफाटा तैनात केला होता. यामध्ये मुंबईसह ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com