Yashwant Sinha
Yashwant SinhaDainik Gomantak

राष्ट्रपती पदाचे विरोधी उमेदवार यशवंत सिन्हांचा मुंबई दौरा रद्द, कारण आले समोर

एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची ही पहिलीच संधी असल्याचे सांगत ठाकरे यांनी मंगळवारी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला.
Published on

Yashwant Sinha Maharashtra Visit: शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शनिवारी आपला प्रस्तावित मुंबई दौरा रद्द केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, "सिन्हा यांचा मुंबई दौरा, जिथे ते महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांना भेटणार होते, ती भेट रद्द करण्यात आली आहे." शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Yashwant Sinha
Maharashtra Cabinet: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा निर्णय; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची ही पहिलीच संधी असल्याचे सांगत ठाकरे यांनी मंगळवारी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेचे लोकसभेत 19 खासदार असून त्यापैकी 18 महाराष्ट्रातील आहेत. त्याचे राज्यसभेत तीन सदस्य आणि विधानसभेत 55 आमदार आहेत. मात्र, यापैकी 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले आहेत. राष्ट्रपतीपदाची पुढील निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. मुर्मू आणि सिन्हा यांच्यात निवडणूक होणार आहे.

Yashwant Sinha
मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा होणार या तारखेला, येथे पहा वेळापत्रक

या प्रादेशिक पक्षांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला

BJD, YSR-CP, BSP, AIADMK, TDP, JD(S), शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना यांसारख्या काही प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळाल्यानंतर मुर्मूच्या मतांची टक्केवारी आधीच 60 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. प्रचारानिमित्त मुर्मू गुरुवारी मुंबईत आल्या होत्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांची भेट घेतली. त्यांनी शिवसेनेच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या आमदारांचीही भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com