Maharashtra Cabinet: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा निर्णय; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

नव्या मंत्रिमंडळाने आज पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय जाहीर केला आहे.
CM Eknath Shinde And DCM Devendra fadnavis
CM Eknath Shinde And DCM Devendra fadnavisANI /Twitter
Published on
Updated on

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. औरंगाबादच नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव होणार आहे. याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून घेतला जाईल आणि नंतर केंद्र सरकार कडे तो पाठवला जाईल असे म्हणाले आहेत. यासोबतच नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. (Cm Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Cabinet Meeting News)

महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट मध्ये घाईगडबडीत अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असे करण्यात आले आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CM Eknath Shinde And DCM Devendra fadnavis
"...तर मी राजकारण सोडेन" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

मुंबई (Mumbai) आणि उपनगर भागामध्ये MMRDA त्या विविध प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींसाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com