Mumbai School Reopen: मुंबई महानगरपालिकेने (BMC) पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्था 2 मार्चपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मार्च 2020 च्या लॉकडाऊननंतर (Lockdown) ही पहिलीच वेळ असणार आहे. बीएमसीने सर्व शाळा पूर्णपणे उघडण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे, कॉमोरबिडीटीस आणि आधीपासून जुन्या आजारांनी त्रस्त (Chronic Diseases) असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात हजर राहण्यासाठी पालकांनी संमती (Consent Letter) द्यावी लागेल. (Pre Primary To 12th Standard Schools In Mumbai Will Start On March 2)
दरम्यान, शुक्रवारी राज्य अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शैक्षणिक संस्था पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळात सर्व शाळा कोरोना नियमांचे पालन करुन काम करतील. संपूर्ण महाराष्ट्रात 100% ऑफलाइन मोडमध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासाठी प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली
महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील ट्वीटरवरुन ट्वीट करत सांगितले की, "मुंबईतील शाळा मार्चपासून प्री-कोविड वेळा, पूर्ण उपस्थिती, अभ्यासक्रमेतर उपक्रम, कोविड नियमांव्यतिरिक्त शाळेच्या बसेस पुन्हा सुरु करण्यात येऊ शकतात. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे.''
बीएमसीने शाळा महाविद्यालयासाठी जारी केलेल्या नवीन एसओपीमध्ये म्हटले...
मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या एसओपीमध्ये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा एक्टिविटी आणि एक्स्ट्रा करीकुलर एक्टिविटी पुन्हा सुरु करण्याची परवानगी आहे, या एक्टिविटी करताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. मात्र, विद्यार्थ्यांना वर्गात मास्क घालणे आवश्यक आहे. शाळांमध्ये सतत थर्मल स्क्रीनिंग करावे लागेल.
तसेच, अपंग आणि स्पेशल विद्यार्थ्यांनाही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्गात 100 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. शहरातील बेस्ट बसमधून शाळकरी मुले प्रवास करु शकतात.
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, संसर्गाची घटती रुग्णसंख्या पाहता, राज्य, जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज्यभरात शाळा, महाविद्यालये पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने खोलण्यास परवानगी दिली जाईल.
शिवाय, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे सांगितले की, 'शाळांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित केली जातील. त्याचबरोबर 15 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मुलांना लस घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.