'वंचितची' धुरा आता प्रभारी अध्यक्षांकडे

पक्ष आणि संघटना हे चालेल पाहिजे आंदोलनाला आपण सुरवात केली आहे आणि हे आंदोलन सुरु राहिले पाहिजे
Prakash Ambedkar is away from politics for 3 months
Prakash Ambedkar is away from politics for 3 monthsDainik Goamntak
Published on
Updated on

वंचित बहुजन आघाडीचे(VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आपल्या फेसाबुक अकाउंट वरून व्हिडिओ पोस्ट करत 'मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात ३ महिने कार्यरत राहणार नाही. व्यक्तिगत कारणासाठी मी पक्ष कार्यापासून तीन महिने लांब राहणार आहे.' अशी घोषणा करत त्यांनी आपले वयक्तिक कारण आहे असेही सांगितले आहे.

मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात ३ महिने कार्यरत राहणार असून व्यक्तिगत कारणासाठी मी पक्ष कार्यापासून तीन महिने लांब राहणार आहे. पक्ष आणि संघटना हे चालेल पाहिजे आंदोलनाला आपण सुरवात केली आहे आणि हे आंदोलन सुरु राहिले पाहिजे.तसेच येत्या काही काळात ५ जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहेत आणि म्हणून पक्षालाअध्यक्ष असणे महत्वाचे आहे त्यासाठीच वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि इतर सर्वे कार्यकर्ते त्यांना मदत करून पक्ष यशस्वीरीत्या आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करूया. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी रेखा ठाकूर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे राजकारणात मोठया प्रमाणात सक्रिय झाले आहेत. २०१४ पासून महाराष्ट्रात ज्या कॊणत्या निवडणूका झाल्या त्यात त्यांच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात प्रचार करून जवळपास संपूर्ण महाराष्ट्र्र पिंजून काढला होता. त्यांच्या पक्षाला यश जरी मिळाले नसले तरी त्यांनी राज्याच्या प्रत्येक निवडणुकीत आपली छाप सोडली आहे. पुढे त्यांनी राज्यात एआयएमआयएमशी युती करून तर सगळ्यांचेच लक्ष वेधले.कालांतराने ही युती संपुष्टता अली खरी मात्र अनेक दिवस या युतीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरूच होती. हल्लीच मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी प्रकाश आंबेडकरांची पुण्यात भेट घेतली आणि आंबेडकर स्वतः मराठा आरक्षणासाठी उभे राहिले.

Prakash Ambedkar is away from politics for 3 months
"राणे जिथे गेले तिथली सत्ता गेली, आता मोदींना शुभेच्छा"

अशा अनेक घटनांनी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आता या ३ महिन्याच्या कालावधीत नेमके काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com