पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे Dainik Gomantak

"राणे जिथे गेले तिथली सत्ता गेली, आता मोदींना शुभेच्छा"

विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या 4 नेत्यांना स्थान मिळणार आहे, मात्र यावेळी चर्चा सुरू आहे ती नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची.
Published on

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत असुन, यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या 4 नेत्यांना स्थान मिळणार आहे. यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, भारती पवार, भागवत कराड या नेत्यांचा समावेश असणार आहे. तर आजच्या या मंत्री मंडळ विस्तारात एकुण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र यावेळी चर्चा सुरू आहे ती नारायण राणे यांच्या नावाची. (Narayan Rane has been sworn in as a Union Minister today)

“राणे युतीचे मुख्यमंत्री झाले...युतीची सत्ता गेली...राणे कॉंग्रेसमध्ये गेले..कॉंग्रेसची सत्ता गेली..राणे भाजपमध्ये गेले...महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेली...राणे आज केंद्रीय मंत्री झाले..मोदींना शुभेच्छा...” अशा आशयाचे अनेक गमतीदार मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमका याचा फायदा होणार की तोटा हे आता येणाऱ्या काळात पहावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील आयारामांची लागली लॉट्री ?

दरम्यान, नारायण राणे यांचा नगरसेवक पदापासुन सुरू झालेला प्रवास आता त्यांना दिल्लीपर्यंत घेऊन गेला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते मुख्यमंत्री झाले होते. तर आज त्यांना पहील्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com