PM Modi in Pune: वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन पंतप्रधान मोदींचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
PM Narendra Modi in pune
PM Narendra Modi in puneTwitter /@ANI
Published on
Updated on

PM Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला भेट देणार असून ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. यावेळी राजमुद्रा काढलेला आणि वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला. अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही ते आज पुण्यात करणार आहेत. याशिवाय ते आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन करतील आणि सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचेही उद्घाटन करतील.

PM Narendra Modi in pune
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, वाचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लीकवर

सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj) पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ही मूर्ती 1850 किलो वजनाच्या बंदुकीच्या धातूपासून बनवण्यात आली असून ती सुमारे 9.5 फूट उंच आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ (Pune Airport) येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उदयन राजे भोसलेआदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com