
गोव्यासह महाराष्ट्रात पावसानं धूमशान घातलं आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कोकणातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंदुदुर्गमध्ये मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धबधबे ओसांडून वाहू लागले आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील (Ratnagiri) पानवल धबधबा पावसामुळे प्रावाहित झाला. मुसळधार पावसामुळे पानवल धबधब्याचे मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या राजीतील हा धबधबा पर्यटकांना खुणावतो. मागील तीन-चार दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरु असल्याने पानवल धबधबा ओसांडून वाहत आहे. पानवलचा हा धबधबा रत्नागिरी स्टेशनपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकणात पावसाची जोर कायम आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर येथील धबधबे देखील आता प्रवाहित झाले आहेत. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.