महाराष्ट्राचं राजकारण सध्या अनेक वाद विवादांनी घेरलेलं असताना आज विजयादशमीच्या मुहुर्तावर भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावरुन महाराष्ट्राच्या जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना संदेश देत आहेत.
पंकजा म्हणाल्या, भगवानबाबाचा जागर करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला आहात. भक्ती आणि शक्तीची परंपरा सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. एवढा देखना सोहळा मला वाटत नाही देशात कुठे होत असेल. कोण्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी विमानातून फुले टाकत नव्हते तर, भगवान बाबाच्या भक्तीसाठी या फुलांची आराधना करत होते. बैल जेवढा गरीब असतो तेवढी माणसं गरीब नसतात. आई जशी मुलाची दृष्ट काढते तसा पदर तुमच्यावरुन ओवळून मी तुमची दृष्ट काढत आहे. आहे का कोणी नेता असा जो मला म्हणले की, तुला मखमलीच्या खुर्चीवर नेऊन बसवतोय म्हणणारा.
दरम्यान पंकजा पुढे म्हणाल्या, लोकांना दिशा दाखविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज या मंचावर सगळ्या जाती, धर्माचे लोक उपस्थित आहेत. विजयादशमीचा सोहळा पावन करण्यासाठी तुम्ही सर्वजण उन्हातान्हात बसून आहात. मुंडे साहेब कधी सत्तेत होते का? तरीपण लोक मुंडेसाहेबांवर तुम्ही प्रेम करत राहिलातच ना. मी काय बोलणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार होता, त्याकाळात मी दौरे करायचे होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या कोरोनाच्या काळात आम्ही कोविड सेंटरची उभारणी केली. घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येकाला मदत केली. ज्यांना गरज असेल त्यांना औषधे उपलब्ध करुन दिली.
शिवाय, प्रत्यकेच्या आकांऊटमध्ये पैसे पोहोचविण्याचे काम आम्ही कोरोनाच्या काळात केले. तसेच लोकांना या मेळाव्याच्या माध्यमातून उर्जा मिळते. महाराष्ट्र जनतेची आता काय अवस्था आहे ते तुम्ही पाहतच आहात ना. तुम्ही जनतेच्या हिताचे काम करा आम्ही तुमचे स्वागत करु असं म्हणत ठाकरे सरकारवर पंकजा मुंडे यांनी हल्लाबोल चढवला. आज या आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला आज सुरक्षित नाही. आपलं मंत्रीपद भाड्याने दिले आहे म्हणत धनंजय मुंडे यांना चिमटाही त्यांनी यावेळी काढला. राज्याला ज्यावेळी अतिवृष्टीचा तडाखा बसला तेव्हा आम्ही गावोगावी जाऊन राज्यातील जनतेला आम्ही मदत केली. आघाडी सरकारने अतिवृष्टीच्या काळात दिलेले पॅकेज अपुरे होते. राज्यातील जनतेच्या हिताचे कामे सरकारने करावीत असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मी पुन्हा उचलणार आहे. ओबीसी समाज हा राजकीय आरक्षण मागतो. तर मराठा समाज नोकरीमध्ये आरक्षण मागत आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हार घालणार नाही. राज्यातील तीन पक्ष एकमेकांना खूष करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे जनतेचे नुकसान होत आहे.
प्रीतम मुंडे म्हणाल्या, आज सावरगाव मधील दसऱ्या मेळाव्यानिमित्त भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. आपला आवाज मुबंई पासून ते दिल्लीपर्यंत पोहोचतो. सावरघाट गावाच्या गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करते. आज या मेळाव्याला येत असताना हा आज मेळावा होईल का नाही अशी शंका माझ्या मनामध्ये काहीशी येऊन गेली होती. मात्र आता जमलेला जनसमुदाय पाहिल्यानंतर हा खरा दसरा मेळावा असल्याचे प्रतित होत आहे. विजयादशमीनिमित्त मी सर्वांना सुभेच्छा देते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारा जनसमुदाय येथे अधिक लक्षवेधी ठरतो. आपला मेळावा कोणत्याही प्रकारचा राजकीय मेळावा नाही तर राज्यातील शोषितांचा मेळावा आहे. त्यामुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या भक्तांचा मेळावा आहे. ज्या कोणाला शंका असेल त्यांनी येथे जमलेला जनसमुदाय एकदा येऊन पाहावा. मी मुंडे साहेबांकडून आशिर्वाद घेऊन निघाले तेव्हा त्यांना मी फक्त एकच मागणं मागितले की, समाजामध्ये आता निर्माण झालेली नकारात्मता संपावी. हा कोणत्या आघाडीचा स्टेज नाही. कीतीही अग्रह तुम्ही केला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत.
महादेव जानकर यावेळी म्हणाले, आज विजयादशमीच्या निमित्त आज भगवान गडावर जमलेल्यांना दसऱ्याच्या सुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम राजकीय स्वरुपाचा नाही तर पंकजा मुंडे यांच्या इच्छा आणि युक्तीचा आहे. सत्ता असेल किंवा नसेल परंतु नेता हा सदैव आपल्या पाठिशी असतो. सावरगावची निर्मिती कोणी केली याची आपण सर्वांनी जाणीव ठेवावी. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे. गोपीनाथरावांनी माझ्या कानात कुर्रर्रर्र केले आहे. नेता विकत घेता नाही. नेता कोणालाही विकत घेता येत नाही. आम्ही समाजाचा विकास करतोय. तुम्ही सगळे मिळून पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहणार का नाही असं म्हणत जानकरांनी जनतेला साद घातली. एकादा मुलगा मेला तरी चालेल परंतु आई मरु नये, कारण पंकजाताई आपली आई आहे. सर्वात जास्त आर्थिक फंड पंकजाताई पालकमंत्री असताना बीडकरांना दिला आहे. ओबीसी समाजाची राज्यात अशी काय अवस्था झाली. राज्य म्हणते माझ्याकडे डेटा नाही, केंद्रही आपली भूमिका मांडत नाही. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, अशी आपेक्षाही यावेळी जानकरांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.