'हिंदुस्थान' म्हणजे निर्लज्जांचा देश, संभाजी भिडे पुन्हा बरळले

दारुची दुकाने खुली ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे शासनकर्ते बेशरम, नालायक असल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideDainik Gomantak
Published on
Updated on

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेमध्ये आले आहेत. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले आहे. दारुची दुकाने खुली ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे शासनकर्ते बेशरम, नालायक असल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि त्याचवेळी सीतामातेचे अपहरण झाले. तशाचप्रकारे आपल्या शासनकर्त्यांनी विवेक हरवला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी-सभांजी महाराजांची आपल्या अंतकरणात वस्ती असती तर देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते ते झाले असते. विजयादजशमीनिमित्त साध्या पध्दतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपाप्रसंगी भिडे बोलत होते.

भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? मात्र आपण तो मिळवला आहे. भारताचा कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येमध्ये पुढे आहे. परंतु निर्लज्जपणामध्ये आपण कधीच पहिला क्रमांक मिळवला असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केला.

Sambhaji Bhide
एल्गार परिषद प्रकरणी वरवर राव यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

जगाच्या पाठिवर सुमारे 187 देश आहेत. परंतु पारतंत्र गुलामीमध्ये राहण्याचा बेशरमपणा त्यांना वाटत नाही. 123 कोटी नागरिकांचा देशही या जगामध्ये आहे. प्रदिर्घ काळ ब्रिटीशांचा मार खात, दास्यत्व पत्करत तसेच त्यांचं खरकटं खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे भारत असही त्यांनी यावेळी म्हटले.

Sambhaji Bhide
वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालय़ाकडून अंतरिम जामीन मंजूर 

राज्यकर्त्यांचे बुध्दी विकारवश झाली

विजयादशमीनिमित्त शिवप्रतिष्ठानकडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी नाकरल्यामुळे संभाजी भिडे यांनी आक्रमक होत राज्यात शासन करत असलेल्या ठाकरे सरकारवर (Thackeray government) चांगलेच भडकले. प्रभू रामचंद्रांना जशी सोन्याच्या हरणाची भुरळ पडली आणि आपला विवेक हरवून बसल्यामुळे सोन्याच्या हरणाची शिकार करण्यासाठी करायला गेले. आणि त्यानंतर सीतेचे अपहरण झाले तसे आताच्या शासनकर्त्यांच्या अकला, बुध्दी आणि मेंदू हे विकारवश झाले आहेत. त्यामुळेच दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही. परंतु हेच महाविकास आघाडीतील नेते लॉकडाऊन झाल्यानंतर 21 व्या दिवशी महसूल वाढविण्यासाठी दारुची दुकाने उघडी ठेवतात. आणि मात्र आमच्या सण समारंभावर बंदी घालतात हे त्यांचे वर्तन बेशरम आणि नालायक वृत्तीचे आहे, अशा शब्दामध्ये संभाजी भिडेंनी ठाकरे सरकारवर कोरडे ओढले.

आमदार आणि खासदारांचा काय उपयोग?

बड्या बड्या व्यक्तींची बुध्दी निर्णय घेण्याच्या वेळी विकारवश होते, तशा आताच्या शासनकर्त्यांच्या अकला, बुध्दी, मेंदू विकारवश झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी विजयादशमीच्या मुहुर्तावर दुर्गामाता दौड करण्यास परवानगी दिली नाही. या दौड सारखी एवढी पवित्र गोष्ट इतर कुठेही नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com