ठाकरे सरकारची शेतकऱ्यांना 10,000 कोटींची नुकसान भरपाई

राज्यात अतिवृष्टीमुळे (Maharashtra Floods) ज्या शेतकऱ्यांच्यापिकांचे नुकसान झाले आहे त्या साऱ्यांना ठाकरे सरकारकडूनमोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Floods: Government announce 10000 cr package for rain affected farmers
Maharashtra Floods: Government announce 10000 cr package for rain affected farmers Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात अतिवृष्टीमुळे (Maharashtra Floods) ज्या शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे नुकसान झाले आहे त्या साऱ्यांना ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) मोठा दिलासा मिळाला आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने बुधवारी 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संयुक्तपणे मुंबईत येथे ही घोषणा केली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकींनंतर (Cabinet Meeting) ही घोषणा करण्यात अली आहे.(Maharashtra Floods: Government announce 10000 cr package for rain affected farmers)

या बद्दल एक निवेदन जाहीर करत सरकारने “यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना काही मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रभावित शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्प्ष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्याच्या जमिनीचा आकार काहीही असो, शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळेल.

राज्य सरकारने मदत वितरणासाठी एनडीआरएफ संदर्भात पुढील कोणत्याही सूचनांची वाट न पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. बिगर सिंचित जमिनीवरील पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये, तर बागायती जमिनीवरील पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 15,000 रुपये मिळतील. बागायती अंतर्गत पिकांसह बाधित शेतकऱ्यांना 12 वर्षांच्या पिकांसाठी प्रति हेक्टर 25,000 रुपये मिळतील, असे देखील राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Floods: Government announce 10000 cr package for rain affected farmers
महाराष्ट्रातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरु

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांबाबत शेतकरी सातत्याने मदतीची याचना करत होते. या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूरला बसला होता . नाशिक, अहमदनगर, धुळे आणि सोलापूरमध्ये देखील मोठे नुकसान झाले होते . नांदेडमध्ये पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com