पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिल्ली वारी

पंकजा मुंडे(Pankaja Munde) हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत एक बैठकही करणार आहेत तसेच या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित राहणार आहेत
Pankaja Munde in Delhi after cabinet expansion
Pankaja Munde in Delhi after cabinet expansion Dainik Gomantak
Published on
Updated on

सबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचा विस्तार(Cabinet Expansion) नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली.यातच बाहेरून येणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची संधि देताना मात्र निष्ठावंतांना डावललं गेले अशी चर्चा सुरु आहे महाराष्ट्रात सुद्धा असेच चित्र समोर यर्त आहे. कारण अंतिम यादी येईपर्यंत चर्चेत असलेल्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांना डावलण्यात आलं.

याच पार्शवभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे सांगितले होते.पण आज मात्र पंकजा मुंडे स्वतः दिल्लीत दाखल झाल्या आहेत, आणि त्यांच्या या दिल्लीदौऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण कालच त्यांच्या नाराज समर्थकांनी राजीमनामे दिले होते आता ही कैफ़ीयत पंकजा मुंडे दिल्ली दरबारी कशी मांडणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Pankaja Munde in Delhi after cabinet expansion
महाविकासआघाडीत बिघाडी ? नाना पटोलेंचं मोठं विधान

पंकजा मुंडे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत एक बैठकही करणार आहेत तसेच या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित राहणार आहेत नेमके या बैठकीत काय चर्चा होणार तसेच पंकजा मुंडेंना काही नवीन जबाबदारी दिली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान काल बीडमध्ये प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे याचाच प्रतेयय बीडमध्ये राजीनामासत्राने आला जिल्ह्यातकाळ 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

मुळातच प्रीतम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून चालू होती . वारंवार मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असल्याचा एक सूरही त्यांच्या समर्थकांत सतत उमटत असतो. राज्याच्या विधानपरिषदेवेळी ही हेच झालेले पाहायला मिळाले कारण पंकजा मुंडेंना डावलत त्यावेळी सुद्धा आयारामांनाच संधी देण्यात अली त्यावेळेपासूनच मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि आता दिल्लीतही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुंडे गट आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com