महाविकासआघाडीत बिघाडी ? नाना पटोलेंचं मोठं विधान

मागील बऱ्याच दिवसांपासून नाना पटोले(Nana Patole) हे आपल्या पक्षासाठी स्वबळाचा नारा देत आहेत
Clashes In Mahavikasaaghadi Govenment Nana Patole claim big statement
Clashes In Mahavikasaaghadi Govenment Nana Patole claim big statementDainik Gomantak
Published on
Updated on

काँगेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) मागील अनेक दिवसांपासून फडणवीस(Devendra Fadanvis) महाविकासआघाडी सरकारवर फोन टॅपिंगचे(Call Tapping) आरोप करत आहेत पण आता त्यांनी चक्क स्वतःच्याच सरकारवर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakery), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना माहिती देण्यासाठी फोन टॅपिंग करण्यात येत असून एक प्रकारे माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप पटोले यांनी महावीसआघाडी सरकारवर केला आहे.

मात्र याबात अधिक न बोलता नाना पटोले यांनी सविस्तर माहिती दिली नाही. मात्र सरकारकडून फोन टॅपिंग होत आहे हे ठामपणे सांगितले आहे.आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडताना पटोले म्हणाले की,‘‘ कॉंग्रेस वाढविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. जुने कार्यकर्ते जोडत आहे. पक्ष वाढविण्यासाठी काम करीत राहणे माझे कर्तव्य आहे. आपल्या पक्षाचा विस्तार करणे त्यासाठी झटणे प्रत्येकाचे काम आहे. ते मी करीत असताना मी कुठे जातो यावर पाळत ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना माहिती दिली जात आहे.’’

Clashes In Mahavikasaaghadi Govenment Nana Patole claim big statement
Maharashtra: हिंगोलीत जमीन हादरली; भुकंपाच्या सौम्य धक्क्याची शक्यता

मागील 2 दिवस पटोले स्वतः पुण्यात होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी पुण्यात सवांदही साधला आहे. याच भेटीदरम्यान त्यांनी पुण्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केलं आहे त्यांच्या याच वक्तव्याने नाना पटोले यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पुण्यात पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

लोणावळ्यात पक्षाच्या मेळाव्यात बोलताना, ‘‘ मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांगतात त्याची कसलीच चर्चा होत नाही. मात्र, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे मी सांगितले तर त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. वास्तविक प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अधिकाधिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे.त्यामुळे माझे काम मी करीत असताना त्यात इतरांनी हस्तक्षेप किंवा त्यावर विशिष्ट भूमिका घेत टीका करण्याचे कारण नाही.’’ असे खडे बोलही त्यांनी आपल्या विरोधकांना सुनावले आहेत.

Clashes In Mahavikasaaghadi Govenment Nana Patole claim big statement
टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये 1100 टक्क्यांनी वाढ

एकूणच काय तर मागील बऱ्याच दिवसांपासून नाना पटोले हे आपल्या पक्षासाठी स्वबळाचा नारा देत आहेत त्यांच्या या विधानाने अगोदरच महाविकासाआघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या भुवया आधीच उंचावल्या असताना त्यांच्या या आरोपांनी तर सरकारमध्ये खळबळ उडेल हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com