'आता इंधनावरील खर्च होऊ शकतो निम्मा'; गडकरींनी सांगितला नवा फॉर्म्युला

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधून त्याचा अवलंब करण्यावर भर देत नितीन गडकरी म्हणाले की, डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असून ते डिझेलपेक्षा स्वस्तही आहे. तसेच, डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान आहे.
Nitin Gadkari's new formula might help in reduction of fuel cost, Nitin Gadkari News
Nitin Gadkari's new formula might help in reduction of fuel cost, Nitin Gadkari NewsDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी देशाला पर्यायी इंधन स्रोतांचा वापर शोधावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच, मालवाहतूक जलमार्गांना चालना द्यावी लागेल कारण ते वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. (Nitin Gadkari's new formula might help in reduction of fuel cost)

Nitin Gadkari's new formula might help in reduction of fuel cost, Nitin Gadkari News
Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात पावसासह गारपिटीची शक्यता

मंगळवारी 'वॉटरवेज कॉन्क्लेव्ह-2022'ला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती वाढत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे आता गरजेचे झाले आहे. डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, ते डिझेलपेक्षाही स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. (Nitin Gadkari News Updates)

मिथेनॉलला चालना द्या

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आसाममध्ये दररोज 100 टन मिथेनॉलचे उत्पादन होते. हे उत्पादन दररोज 500 टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानात बदल करून डिझेल इंजिनचे रूपांतर मिथेनॉल इंजिनमध्ये केले तर त्याचा फायदा आसामला होईल. ते म्हणाले की, मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी होईल. गडकरी म्हणाले, “आम्ही मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू शकतो आणि त्याऐवजी डिझेल इंजिन घेऊ शकतो. डिझेल इंजिनांना मिथेनॉल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान स्वीडिश कंपनीकडे आहे."

जलमार्गांचा अधिक वापर

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, मालवाहतुकीसाठी जलमार्गांचा अधिक वापर केला पाहिजे. रस्त्याने वाहतुकीचा खर्च 10 रुपये असेल तर तो रेल्वेमार्गे 6 रुपये आहे. दुसरीकडे, जलमार्ग वापरल्यास हा खर्च केवळ 1 रुपयापर्यंत खाली येतो. सध्या वाहतूक खर्च खूप जास्त आहे. ते कमी करणे आवश्यक आहे. जलमार्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देताना ते म्हणाले की, यामुळे व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मिथेनॉलच्या वापराचा विचार करून जलमार्गातून अधिक मालवाहतूक करण्याचा पर्याय पाहण्याची सूचना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com