Maharashtra: "डिनो मोरिया मुंबई महापालिकेचा सचिन वाझे"

Maharashtra: डिनो मोरियाचे (Dino Morea) चार-पाच चित्रपट सोडले तर त्याची बॉलिवूडमध्ये विशेष काही ओळख नाही.
Maharashtra: Dino Morea is Sachin Waze of BMC
Maharashtra: Dino Morea is Sachin Waze of BMCDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra: डिनो मोरियाचे (Dino Morea) चार-पाच चित्रपट सोडले तर त्याची बॉलिवूडमध्ये विशेष काही ओळख नाही. डिनो मोरिया लोकांना सांगत राहतात की त्यांना मुंबई महानगरपालिकेशी (BMC) संबंधित कोणतेही काम सांगितल्यास ते क्षणात सोडवतील. असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ED) ने अभिनेता डिनो मोरियावर केलेल्या कारवाईनंतर नितेश राणे खूप आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले की सखोल चौकशी केल्यास अनेक 'पेंग्विन' बाहेर येतील. डिनो मोरेया हा बीएमसीचा सचिन वाजे असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यासाठी सर्व पुरावे त्याच्याकडे आहेत. (Nitesh rane said Dino Morea is Sachin Waze of BMC)

Maharashtra: Dino Morea is Sachin Waze of BMC
सचिन वाझेची आता CBI चौकशी

नितेश राणे यांनी आज (शनिवारी) ट्विट करून या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. असे करत असताना त्याना शिवसेनेला टोला लगावला आहे. बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करणार्‍या डिनो मोरियाची काही खास ओळख नाही. डिनो मोरिया लोकांना सांगत असतात की मी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोणतेही काम एका क्षणात करू शकू. डिनो मोरिया मित्र कोणाचा आहे? असे त्यांनी आपल्य ट्विट मध्ये लिहिले आहे. असे म्हणून त्यांनी शिवसेनेच्या युवा नेते आणि मंत्र्यांवर निशाणा लगावला आहे.

Maharashtra: Dino Morea is Sachin Waze of BMC
बँक घोटाळ्यात ईडीची करवाई अजित पवार यांच्या जवळच्या मित्राचा साखर कारखाना जप्त

अभिनेता दिनो मोरिया यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई

दिवंगत कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचा जावाई, आणि अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती गुजरातमधील औषधनिर्माण कंपनी स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इडीने कारवाई केली आहे.

बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांच्या संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याची माहिती ईडीने दिली. या मालमत्तेत, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स, म्युच्युअल फंड्सचा समावेश आहे. जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटींची मालमत्ता ही संजय खान यांची आहे. तर डिनो मोरियाची 1.4 कोटी रुपये आणि डीजे अकील नावाने प्रसिद्ध असलेल्या अकील अब्दुल खलील बचू अलीची संपत्ती 1.98 कोटी रुपये इतकी आहे. अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41कोटी रुपये आहे.

Maharashtra: Dino Morea is Sachin Waze of BMC
PM केअर फंडातले पैसे Covid मृतांच्या कुटूंबियांना द्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com