
न्यू ईयरच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक कोकणासह गोव्यात पोहोचले होते. मात्र आता, कोकणासह गोव्यात न्यू ईयरचं दणक्यात सेलिब्रेशन करुन मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगाव येथे सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या आहेत.
माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून या महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
दरम्यान, थर्टी फर्स्टचा जल्लोष आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणासह गोव्यात पर्यटक पोहोचले होते. ख्रिसमस, सनबर्न आणि थर्टी फर्स्टसाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक गोव्यात (Goa) येतात. त्यामुळे 25 डिसेंबरपासून महामार्गावर कोंडी निर्माण होत होती.
दुसरीकडे, वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. अनेक सरकारे आली आणि गेली पण महामार्गाचं काम पूर्ण करण्यात कोणीही स्वारस्य दाखवले नाही. सरकारांनी लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगून केवळ चालढकल केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.