'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच असेल' राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल. जाहीर सभेला संबोधित करताना मुंडे म्हणाले
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. शनिवारी परभणी शहरातील जाहीर सभेला संबोधित करताना मुंडे म्हणाले की, त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमधील सामाजिक न्याय विभागाला प्रतिष्ठा मिळाली आहे.

(NCP leader claims that the next Chief Minister of Maharashtra will be Sharad Pawar's party)

Sharad Pawar
राज्यसभा निवडणुकीआधी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याची तयारी सुरू

उद्या सामाजिक न्याय खाते कोणाकडे सोपवायचे, असा प्रश्न निर्माण झाला तर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल… आणि मुख्यमंत्री फक्त आपलाच असेल. मुख्यमंत्री म्हणतील सामाजिक न्याय खाते आमच्या राष्ट्रवादीकडे सोडा. या विभागाने खूप नावलौकिक मिळवला आहे.

गेल्या महिन्यात सत्तेत अडीच वर्षे पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) महत्त्वाचा घटक आहे. मुंडे म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे.

"यापूर्वी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझी (महाराष्ट्र विधान परिषदेत) विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. मी तत्कालीन सरकारला हादरा दिला. नुकतेच महाराष्ट्र सरकारमधील आघाडीचे सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Sharad Pawar
काश्मिरी पंडितांचे आमच्या राज्यात स्वागत: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

वास्तविक, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी केल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले संतापले होते. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपला टक्कर देत राष्ट्रवादीने आपला उमेदवार विजयी केला. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.

यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पलटवार करत पटोले यांना भाजपसोबतच्या जुन्या नात्याची आठवण करून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com