राज्यसभा निवडणुकीआधी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याची तयारी सुरू

उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची 6 जून रोजी शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Rajya Sabha Election Updates 2022
Rajya Sabha Election Updates 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात 'रिसॉर्टचे राजकारण' परत आले आहे. येथे अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपने आपल्या आमदारांसह अपक्षांपर्यंत पोहोचण्याची कसरत सुरू केली आहे. यासोबतच या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याचीही तयारी सुरू आहे. (Rajya Sabha Election Updates 2022)

Rajya Sabha Election Updates 2022
शिवराज्यभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून होणार साजरा

महाराष्ट्रात 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षात घेण्याचा शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न आहे. येथे सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आपले आमदार तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना थांबवण्यासाठी रूम बुक केल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणी ही योजना रद्द करण्यात आली आहे. भाजपही आपल्या आमदारांना याच हॉटेलमध्ये तळ ठोकण्याचा विचार करत असल्याची माहिती पक्षाला मिळाल्याने शिवसेनेला ही योजना रद्द करावी लागल्याचे बोलले जात आहे.

Rajya Sabha Election Updates 2022
उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो : गुलाबराव पाटील

सध्या शिवसेना आपल्या आमदारांना शहराच्या पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जात आहे. त्याची जबाबदारी पक्षाने एका ज्येष्ठ नेत्याकडे सोपवली आहे. शिवसेनेच्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची 6 जून रोजी सायंकाळी वर्षा बंगल्यावरील शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातील शिवसेनेच्या आमदारांनाही मुंबईत बोलावण्यात आले असून ते संध्याकाळी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

बैठकीनंतर मतदानाच्या तारखेपर्यंत सर्व आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी, 7 जून रोजी, मुख्यमंत्री उद्धव एमव्हीए सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांची भेट घेतील, अशी माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com