Navaratri मध्ये कोरोनाचे निर्बंध नकोच, आमदार सुर्वेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navaratri 2022: गणेशोत्सवानंतर आता अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे.
Navaratri 2022
Navaratri 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

गणेशोत्सवानंतर अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधानात हा ऊत्सव साजरा करण्यात आला होता. पण आता कोरोनामुळे घातलेले निर्बंध नवरात्रीच्या काळात मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळण्याची परवानगी आहे. हे पाहता महाराष्ट्रातही तशी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

सुर्वे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, कोरोनामुळे दोन वर्षानंतर नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकारने या उत्सवाच्या वेळेबाबत आणि इतर नियमांबाबतचे सर्व निर्बंध हटवावेत. तसेच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी गरबा आणि दांडियाच्या वेळा रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी शिंदेंकडे केली आहे.

Navaratri 2022
Maharashtra Rain: मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव (Navratri) साजरा करण्याची आणि नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी आहे. याशिवाय उर्वरित आठ दिवस रात्री 10 वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे. या वर्षी दररोज रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

* 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरु

यंदा नवरात्रोत्सव 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. ज्यामध्ये दुर्गेच्या दिव्य रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाची कमी प्रकरणे समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com