गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई (Mumbai), कोकण (Konkan) तसेच, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज दर्शविला आहे.
मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. काल (सोमवारी) दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. तसेच, मध्यरात्रीही पावसाची उघडझीप सुरु होती. अशातच गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे काही गाड्या सबवेमध्ये अडकल्या असून काही गाड्या साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत.
पावसाचा जोर असाच जर काहीवेळा कायम राहिला तर पश्चिम उपनगरांत सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. कुर्ल्यात मागील एका तासात 39 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चेंबूरमध्ये देखील धुवांधार पाऊस सुरू आहे. चेंबुरमध्ये मागील एका तासात 32 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्याती काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मच्छिमारांना पुढील 2 दिवस सर्तकतेचा इशारा
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षता घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.