Navapur Railway Station: एका राज्यात तिकीट काउंटर तर दुसऱ्या राज्यात बाथरूम!
अतुल्य भारत हा केवळ म्हणण्यापुरता नाही. भारत खरोखरच अतुलनीय आहे कारण भारतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची तुलना इतर कोणत्याही देशाशी होऊ शकत नाही. धक्कादायक ठिकाणे, आश्चर्यकारक लोक, यामुळे भारत एक अतिशय खास देश (India) बनला आहे. अशीच भारतातील एका रेल्वे स्टेशनशी संबंधित एक खास गोष्ट. आपण ज्या रेल्वे स्टेशनबद्दल बोलत आहोत ते 1 नव्हे तर 2 राज्यांचा भाग आहे. (Facts about Navapur railway station)
कदाचित तुम्ही असे रेल्वे (Indian Railway) स्टेशन कधी पाहिले नसेल, पण भारताच्या पश्चिम कोपऱ्यात असे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचा दोन राज्यांमध्ये समावेश आहे. या अनोख्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे नवापूर रेल्वे स्थानक. नवापूर हे महाराष्ट्रातील (Maharashtra) नंदुरबार जिल्ह्यात येते, परंतु त्याचे रेल्वे स्टेशन महाराष्ट्र तसेच गुजरातचा भाग आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र आणि गुजरात (Gujarat) सीमेच्या मध्यभागी हे स्टेशन आहे.
एक लाकडी बाक या दोन राज्यांला विभाजित करते
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर सीमा जाते त्या प्लॅटफॉर्मवर एक लाकडी बेंच आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा या बाकाला विभागून जातात. म्हणजे या स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे तर अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. याशिवाय प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या स्टेशन आणि इतर गोष्टींचीही राज्यानुसार विभागणी करण्यात आली आहे.
4 भाषांमध्ये होते उद्घोषणा
2018 मध्ये, तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर या स्टेशनचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले - "राज्यांमुळे वेगळे झालो, पण रेल्वेमुळे एकजूट आहे." यासह त्यांनी नवापूर स्थानकाची माहिती दिली होती. या रेल्वे स्टेशनची लांबी 800 मीटर आहे, त्यापैकी 500 मीटर गुजरातमध्ये आहे आणि उर्वरित 300 मीटर महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच या रेल्वे स्थानकावर ट्रेनची उद्घोषणा इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये केली जाते. तिकीट काउंटर आणि रेल्वे पोलीस स्टेशन महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहेत तर स्टेशन मास्टर ऑफिस, वेटिंग रूम आणि वॉशरूम गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहेत.
वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर निर्बंध आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या स्थानकावर राज्यांच्या निर्बंधांशी संबंधित नियम देखील लागू होतात. म्हणजेच गुजरातच्या बाजूने दारू पिण्यास बंदी आहे, तर महाराष्ट्राच्या बाजूने पान-मसाला आणि गुटख्यावर बंदी आहे.
अशी आणखी स्टेशन्स
नवापूर हे एकमेव स्टेशन नाही जे दोन वेगवेगळ्या राज्यात आहे. भवानी मंडी रेल्वे स्टेशनचा एक भाग मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये आहे तर दुसरा भाग राजस्थानमधील झालावाडमध्ये आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.