Maharashtra ST Strike: 'एसटी जगली तर...

मध्यंतरी झालेल्या पगारवाढीमध्ये काही त्रुटी असल्यामुळे पुन्हा एकदा झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे देखील एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या बोर्डाने यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले.
ST
ST Dainik Gomantak

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून एसटी महामंडाळाचे आंदोलन (Maharashtra ST Strike) सुरु होते. त्यानंतर राज्य सरकार आणि एसटी कर्मचाराऱ्यांच्या समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला होता. मात्र मध्यंतरी झालेल्या पगारवाढीमध्ये काही त्रुटी असल्यामुळे पुन्हा एकदा झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या बोर्डाने यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर योग्य तो तोडगा निघाला असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने म्हटले आहे. दुसरीकडे मात्र अजूनही काही मागण्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू असल्यामुळे राज्यातील एसटी अद्याप बंद आहे. चर्चेतून मार्ग काढायचा असल्यास पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी राज्य सरकार आणि समिती एकत्र येण्यासाठी तयार असल्याचे समितीने म्हटले आहे. जे एसटी कर्मचारी सेवेत हजर होतील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे देखील राज्य सरकारने म्हटले असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही अजूनही ठाम असल्याची भूमिका एसटी. कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने म्हटले आहे. त्याचबरोबर न्यायालयामध्ये (Court) विलीनीकरणाऱ्या मुद्यावर जो काही निर्णय येईल त्यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी समितीसाठी मान्य असल्याचे देखील समितीने म्हटले आहे.

ST
Maharashtra: लसीकरण करणे आवश्यकच अन्यथा पिझ्झा,बर्गर विसरा

अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटलं, ‘’राज्य परिवहन मंडळातील 22 कृती कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी सकारात्मक चर्चा पार पडली. तसेच विलीनीकरणाबाबतचा अहवाल येत्या 3 आठवड्यांमध्ये सादर होणार आहे. संप मागे घेऊन कामावर पतण्यासाठी तीन वेळा मुदत आम्ही दिली होती. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही कारवाई करण्यात येणार नाही. पगारवाढ, कर्मचाऱ्यांवरील कारवाई, विलीनीकरणाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मटाऱ्यांनी पुन्हा कामावर परतावे. तुमच्या काही मागण्या आहेत, त्या तुम्ही न्यायहक्काने मागा.. कोणालाही वेठीस धरुन आपल्या प्रश्नांसाठी भांडू नका.’’

शरद पवार म्हणाले, ‘’कृती समितीबरोबर झालेली बैठक सकारात्मक होती. गेली दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचे हाल झाले. राज्य सरकारला मोठी आर्थिक हानी झाली. तसेच काही त्रुटी आमच्या नजरेस आणून दिल्यामुळे याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. एसटी कशी जगली पाहीजे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आपली बांधिलकी प्रवशांशी आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे. गेले दोन महीने जेवढे कठीण गेले ते मी कधीही पाहिले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतात, मात्र त्या पूर्ण करण्यासाठी आपण कुठपर्यंत जावे हे कर्मचाऱ्यांनी ठरवले पाहिजे. विलीनीकरणाबाबत मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com