Devi Singh Shekhawat
Devi Singh ShekhawatDainik Gomantak

Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

अमरावतीचे पहिले महापौर
Published on

Devisingh Shekhawat Passed Away: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देवीसिंग शेखावत (Devi Singh Shekhawat) यांची तब्येत खालावली होती.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर त्यांना ही समस्या जाणवू लागली होती. पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वयाच्या 89 व्या वर्षी देवीसिंग शेखावत यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्‍या काही वर्षांपासून ते पुण्‍यात वास्‍तव्‍याला होते

अमरावतीचे पहिले महापौर

अमरावतीचे प्रथम महापौर म्हणून देवी सिंग शेखावत ओळखले जातात. शिवाय ते विद्याभारती शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष होते. काँग्रेस पक्षात सक्रीय सदस्‍य असलेले देवीसिंह हे 1991 मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले.

7 जुलै 1965 रोजी देवीसिंह यांचा प्रतिभाताई यांच्याशी विवाह झाला होता. राजस्थानच्या राज्यपालपदी प्रतिभाताई पाटील यांची नियुक्ती झाली, त्यावेळी दोघेही जयपूर राजभवनात राहत होते. त्यानंतर 2007 साली प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com