'धार्मिक संघटनेकडून त्रास, आर्थिक संकट, बायका पोरांचा सांभाळ करणं शक्य होत नाही'; व्हिडिओ रेकॉर्ड करुन सिंधुदुर्गात मुस्लिम युवकाने संपवले जीवन

Religious harassment case Maharashtra: आफताबने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत त्याने धार्मिक संटनेच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.
Religious harassment case Maharashtra | Sindhudurg News
Muslim youth ends life video | SindhudurgDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: धार्मिक संघटनेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत बांदा येथे मुस्लिम युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड त्याने धार्मिक संघटनेवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. आर्थिक संकटात बायको – मुलांचा सांभाळ कसा करु? या विंवचेतून जीवन संपवत असल्याचे त्याने म्हटले आहे. बुधवारी (२९ ऑक्टोबर) पहाटे ही घटना घडली.

आफताब शेख (३८) असे या युवकाचे नाव आहे. उपचारासाठी त्याला सुरुवातीला बांधा प्राथमिक रुग्णालयात आणि नंतर सावंतवाडी उलजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, त्याचा मृत्यू झाला. आफताबने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आफताबने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

Religious harassment case Maharashtra | Sindhudurg News
मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

आफताबने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत त्याने धार्मिक संटनेच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आर्थिक संकट निर्माण झाली असून, बायको – मुलांचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचा आरोप आफताबने केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आफताबच्या नातेवाईकांनी संबधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

Religious harassment case Maharashtra | Sindhudurg News
फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

आफताबचा भाऊ अब्दुल शेख यांनी याप्रकरणी बांदा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात आफताबचा मृत्यू झाला त्यानंतर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात नातेवाईकांनी नकार दिला, यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आफताबच्या आत्महत्येमुळे बांदा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच, कोणत्या धार्मिक संटनेकडून त्याला त्रास दिला जात होता? याबाबत देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com