फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

Ravi Naik statue in Ponda: रवी नाईक यांच्याच पुढाकारातून फोंडा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाले.
Ravi Naik statue in Ponda
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या सन्मानार्थ फोंडा पालिकेने तीन महत्वाचे ठराव मान्य केले आहेत. यापैकी रवी नाईक यांचा पुतळा उभारण्यासंबंधितचा एक महत्वाचा ठराव आहे. पालिकेकडून रवींचा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी दिली आहे.

फोंडा पोलिकेच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी रवी नाईक यांना श्रद्धांजली देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी झालेल्या बैठकीत तीन महत्वाचे ठराव घेण्यात आले. फोंडा येथे होत असलेल्या रिव्हरफ्रंट प्रकल्पाला “रवी सिताराम नाईक रिव्हरफ्रंट” असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

याच प्रकल्पात रवी नाईक यांचा पुतळा देखील उभारला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी दिली.

Ravi Naik statue in Ponda
गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

रिव्हरफ्रंट प्रकल्प पाच कोटी रुपये किंमतीचा असल्याची माहिती यावेळी आनंद नाईक यांनी दिली. तसेच, रवी नाईक यांचे चित्र फोंडा पालिकेची जुनी इमारत आणि नव्या प्रशासकीय इमारतीत लावण्याचा ठराव देखील या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आनंद नाईक यांनी यावेळी दिली.

Ravi Naik statue in Ponda
Goa Politics : खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक (वय ७९) यांचे मंगळवारी (१५ ऑक्टोबर) रात्री ११.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

दरम्यान, रवी नाईक यांच्याच पुढाकारातून फोंडा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी झाले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.

सायंकाळनंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना फोंड्यातील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com