Mahavikas Aghadi Morcha: मुंबईत महामोर्चासाठी चोख बंदोबस्त;वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, वाचा एका क्लिकवर

Mumbai Traffic Update: मुंबईत आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.
Mahavikas Aghadi Morcha | MVA Morcha | Mahavikas Aghadi Morcha Mumbai | Mumbai Traffic Update
Mahavikas Aghadi Morcha | MVA Morcha | Mahavikas Aghadi Morcha Mumbai | Mumbai Traffic Update Dainik Gomantak
Published on
Updated on

MVA Morcha Mumbai: मुंबईत आज महाविकास आघाडीच्यावतीने महा मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. यासाठी बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.

  • हा मार्ग वाहतुकीसाठी बंद

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

  • या पर्यायी मार्गांचा करा वापर

मुंबई पोलिसांच्या सुचनेनुसार, दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा

गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड)

वाहन चालकांना सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करता येईल

Mahavikas Aghadi Morcha | MVA Morcha | Mahavikas Aghadi Morcha Mumbai | Mumbai Traffic Update
Nandurbar :नंदुरबारमध्ये चेतक फेस्टिवल,घोडेस्वारांचे चित्त थरारक स्टंट

भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड

नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड

भायखळा जिजामाता उद्यान (राणी बाग) येथून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी या मार्गाचा वापर करावा

संत सावता रोड- मुस्तफा बाजार- रे रोड- स्लीप रोड- बॅरिस्टर नाथपै रोड- पी डी मेलो रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गाचा वापर करत दक्षिण मुंबईतील इच्छित स्थळी जाता येईल.

परळ आणि लालबागमधून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पुढील मार्ग वापरा

बावला कंपाऊंड- T.B. कदम रोड- व्होल्टास कंपनी-उजवे वळण- तानाजी मालुसरे रोड- अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण-बॅरिस्टर नाथ पै रोड या द्वारे दक्षिण मुंबईतील इच्छित स्थळी जाता येईल.

मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी या मार्गांचा वापर करावा

चार रस्ता-आरए किडवाई रोड-बॅरिस्टर नाथ पै रोड-पी डी'मेलो रोड क्र. 5 मार्गाचा वापर करावा

मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहने खालील मार्गांचा वापर करू शकतात

देवनार IOC जंक्शन- ईस्टर्न फ्री वे- P D'Mello रोड त्यांच्या इच्छित स्थळी.

चेंबूर पांजरपोळ जंक्शन- ईस्टर्न फ्री वे- पी डी'मेलो रोड त्यांच्या इच्छित स्थळी.

दक्षिण मुंबईकडून उत्तर आणि पश्चिम मुंबईकडे जाण्यासाठीचा मार्ग

मुंबई महापालिका मार्ग- मेट्रो जंक्शन- नाना जगन्नाथ शंकर शेठ मार्ग- प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ब्रिज- मरीन ड्राइव्ह रोडचा वापर करावा

दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी पी डीमेलो रोड- ईस्टर्न फ्रीवेचा वापर करावा

दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकडे जाण्यासाठी या मार्गांचा वापर करा

सीएसएमटी स्टेशनवरून पायधुनी, भायखळा आणि नागपाडाकडे जाणाऱ्या वाहनांनी BMC रोड- मेट्रो जंक्शन- लोकमान्य टिळक मार्ग चकालाकडून डावीकडे वळण घेत जे. जे. जंक्शन- दोन टाकी- नागपाडा जंक्शन- खडा पारसी जंक्शनपासून पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com