Mumbai-Goa Travel: मुंबई-गोवा प्रवास होणार अधिक वेगवान; दोन तास वेळ वाचणार...

मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण
Mumbai-Goa Travel
Mumbai-Goa TravelDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Trans Harbour Link: मुंबई-गोवा हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक गतीमान होणार आहे.

ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील प्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई-गोवा वाहतूकही सुसाट होणार आहे.

Mumbai-Goa Travel
Francisco Sardinha on BJP: आमदारांना भाजप विकत घेणार? काय म्हणाले सार्दिन वाचा सविस्तर

हा सागरी पूल पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना गोव्यात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो.

मात्र या सागरी मार्गामुळे 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवासातही दोन तास वाचणार आहेत.

हा सागरी मार्ग दक्षिण मुंबईतील शिवडीपासून सुरू होतो आणि एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडल्यानंतर चार्लीजवळ संपतो. हा 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 17,843 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Mumbai-Goa Travel
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत घट, दक्षिण गोव्यात वाढ; जाणून घ्या आजचे दर

परशुराम घाट बंद राहणार

कोकणातील परशुराम घाट 25 एप्रिल 2023 म्हणजेच येत्या मंगळवारपासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत हा घाट बंद असेल. पुढील 10 दिवस घाट बंद राहणार आहे. 5.40 किलोमीटर लांबीच्या या घाटातील बहुतांशी काँक्रिटीकरणाचे कामे झाली आहेत.

मात्र 1.20 किलोमीटर डेंजर झोन मधील आहे. हे डेंजर झोनमधील काम करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com