Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत घट, दक्षिण गोव्यात वाढ; जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलियम उत्पादनांच्या जागतिक दरांचा देशांतर्गत दरांवर होतो परिणाम
Petrol-Diesel Price In Goa |  Fuel Price In Goa
Petrol-Diesel Price In Goa | Fuel Price In Goa Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये शुक्रवारी घट झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये किरकोळ वाढ झाली.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 24 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांत प्रतीलीटर 7 पैशांची वाढ झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील डीझेल दरांमध्ये प्रतीलीटर 23 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 6 पैशांची वाढ झाली.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

Petrol-Diesel Price In Goa |  Fuel Price In Goa
Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोव्यात येणार; 'या' तारखेला SCO ची बैठक

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84

Panjim ₹ 97.84

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39

Panjim ₹ 90.39

South Goa ₹ 90.29

Petrol-Diesel Price In Goa |  Fuel Price In Goa
Tourist in Goa: गोव्यात गेल्या 6 महिन्यात आले 'इतके' लाख परदेशी पर्यटक; एकूण 341 चार्टर विमाने दाखल

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com