Ambani Family Life Threat: अंबानी कुटुंबाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अज्ञात कॉलरने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करुन संपूर्ण अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, 'सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला बुधवारी एका अज्ञात क्रमांकावरुन हा धमकीचा फोन आला. कॉलरने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, धमकीचे फोन आल्याची तक्रार येताच पोलीस सक्रिय झाले आहेत. या धमकीच्या कॉलचा सोर्स शोधण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. फोन करणार्याचा लवकरच शोध लागेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
रिपोर्ट्सनुसार, सर एचएन रिलायन्स (Reliance) फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबर 1257 वर एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला होता. फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यामध्ये कॉलरने मुकेश अंबानी, नीता, आकाश आणि अनंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. फोन करणाऱ्याने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली आहे.
याचवर्षी 15 ऑगस्टला रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला असाच कॉल करण्यात आला होता आणि रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल केले होते, ज्यामुळे मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका होता.
गेल्या वर्षी, मुकेश अंबानींच्या मुंबईतील (Mumbai) घर 'अँटिलिया' बाहेर 20 स्फोटके आणि धमकीचे पत्रे सापडली होती. त्यानंतर अँटिलियाच्या सुरक्षा पथकाने संशयित स्कॉर्पिओची माहिती पोलिसांना दिली होती. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी तपासासाठी पोहोचले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.