Venkateshwar Temple: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराला दीड कोटींची देणगी दिली. मंदिराच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'भगवान व्यंकटेश्वरावर भक्ती असलेले अंबानी शुक्रवारी पहाटे मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत एनकोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आणि आरआयएलचे इतर अधिकारीही होते.'
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'अंबानींनी प्रार्थना केल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानचे (TTD) अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए.के. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे दीड कोटींचा धनादेश सुपूर्द केला.'
दुसरीकडे, तिरुमला येथील एका टेकडीवरील अतिथीगृहात काही वेळ घालवल्यानंतर अंबानी, राधिका मर्चंट आणि इतरांनी पुरोहितांच्या वैदिक मंत्रोच्चारात गर्भगृहात सूर्योदयाच्या वेळी केलेल्या अभिषेकममध्ये भाग घेतला, जो सुमारे एक तास चालला.
चारधाम बोर्डालाही 5 कोटींची देणगी देण्यात आली
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दान करण्यात नेहमीच पुढे असतात. अलीकडेच, त्यांनी उत्तराखंडच्या (Uttarakhand) चारधाम बोर्डाला 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती. ही देणगी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी दिली.
दान का दिले
वास्तविक, कोरोना काळात मंदिर बंद असल्याने व्यवस्थापन आणि पूजा ठप्प झाली होती. त्यामुळे चारधाम मंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. मंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले होते. अंबानींकडून मिळणारा पैसा धार्मिक स्थळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी वापरला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.