Ladki Bahin Yojna: महायुती सरकारचा मास्टरस्ट्रोक, लाडकी बहीण योजना देतेय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना!

Maharashtra, Ladki Bahin Yojna: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिंदे सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेतर्गंत राज्यातील प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले जातात.
Ladki Bahin Yojna: शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक, लाडकी बहीण योजना देतेय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना!
CM Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मात्र याचदरम्यान, महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना 'मास्टरस्ट्रोक' ठरत आहे. विरोधकांकडून हल्लाबोल होत असताना सरकारने अधिक सक्षमरित्या ही योजना राबवली. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिंदे सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेतर्गंत राज्यातील प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले जातात. विशेष म्हणजे, सरकारने या योजनेसाठी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे.

विरोधकांची टीका आणि जनतेचा पाठिंबा

दरम्यान, विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला. एवढचं नाहीतर त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही सवाल उपस्थित केले. त्यांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. आरोपांमध्ये प्रोग्रामच्या पोर्टलवरील खोट्या डेटाच्या दाव्यांचा समावेश आहे ज्याचा उद्देश त्याच्या ऑपरेशनमध्ये अडथळा आणणे आहे. असे असूनही योजनेची लोकप्रियता कमी झालेली नाहीये. या योजनेला 'स्वयंपूर्णतेची जीवनरेखा' मानून महिला याला पाठिंबा देत आहेत.

Ladki Bahin Yojna: शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक, लाडकी बहीण योजना देतेय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना!
Maharashtra Ladki Bahin Yojana: 1.5 कोटी महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'लाडकी बहीण योजने'चा तिसरा हप्ता जारी

महिलांसाठी कमाईचा स्त्रोत

महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत बनली आहे, ज्यामुळे त्यांना छोटा व्यवसाय सुरु करता आला किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करता आली. या आर्थिक सहाय्याचा विशेषतः गृहिणींना फायदा झाला आहे. ही योजना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये भाजप सरकारकडून यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे.

दुसरीकडे मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासह तमाम विरोधी पक्षातील नेत्यांनी आपली सत्ता आल्यास ही योजना बंद करण्याच्या वल्गना केल्या आहेत. असे असतानाही ही योजना महिला मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. महायुती सरकार या योजनेसाठी वचनबद्ध आहे, याकडे महिलांचे सक्षमीकरण आणि अर्थव्यवस्थेतील त्यांची भूमिका बळकट करण्यासाठी एक प्रमुख उपाय म्हणून पाहत आहे.

Ladki Bahin Yojna: शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक, लाडकी बहीण योजना देतेय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना!
Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना' ठरणार गेम चेंजर? महाराष्ट्रातील महिलांची पसंती; विरोधकांचा डाव फसला

बारा वर्षांपूर्वी गोव्यात लाँच केली योजना

बारा वर्षांपूर्वी गोव्यात लाँच करण्यात आलेली लाडकी बहीण योजना नंतर इतर भाजपशासित राज्यांमध्ये राबवण्यात आली. ही योजना महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि राष्ट्रीय व्यासपीठावर महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महायुती सरकारच्या समर्पणाचे प्रतिनिधित्व करतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com